आटपाडी येथे उद्या आधार फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे आधार फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत गुणगौरव पुरस्कार वितरण व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांगली येथील ज्येष्ठ साहित्यिक व तज्ज्ञ डॉक्टर अनिल मडके कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
सकाळी ९.०० वाजता गुरुवर्यांच्या हस्ते वृक्षारोपण, सकाळी १०.०० वाजता दिघंची येथील पद्मिनी क्लिनिक यांच्यामार्फत वृद्धांसाठी मोफत आरोग्य शिबिर व आधारकाठी वाटप, सकाळी ११.०० वाजता संगीत मैफिल (नृत्य,गायन,काव्य,एकपात्री), बोर्डो या मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक भिमराव मुढे यांची मुलाखत, सकाळी १२.०० वाजता ब्रह्म कमळ साहित्य समूह मुंबई प्रस्तुत मराठी गझल मुशायरा हा महाराष्ट्रातील नामवंत गझलकार यांचा सहभाग असलेला कार्यक्रम होणार आहे.
दुपारी ३.३० वाजता आटपाडी तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये ज्यांनी अतुलनीय कार्य करून तालुक्याचे नाव उंचावले, अशा व्यक्तींचा गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांचे आयोजन आधार फाउंडेशन, आटपाडी यांच्या वतीने जवळे मल्टीपर्पज हॉल, बायपास रोड, आटपाडी येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आधार फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.विनायक पवार, उपाध्यक्ष पंढरीनाथ नागणे, सचिव प्रभाकर नांगरे-पाटील व आधार फाउंडेशनचे सर्व संचालक व सदस्य यांनी केले आहे.