निंबवडे परिसरात वीज कोसळून तीन मेंढ्या ठार!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
निंबवडे

आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे लक्ष्मीनगर परिसरात वीज कोसळून तीन मेंढ्या ठार झाल्या आहेत.
आज आटपाडी तालुक्यात पावसाच्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी विजेच्या कडकडाटाचीही परिस्थिती लोकांना आली. जांभुळणी व पश्चिम भागात विजांच्या कडकडाटासह सायंकाळी पावसाने सुरुवात केली. त्यामुळे श्री सिद्धनाथाच्या यात्रेवर त्याचा परिणाम झाला. पावसामुळे व्यत्यय आला.
निंबवडे येथील लक्ष्मीनगर परिसरात अंकुश रामचंद्र गळवे यांचा मेंढ्यांचा कळप आटपाडी निंबवडे मार्गावर चराईसाठी सोडण्यात आला होता. त्याची राखण करत असताना सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट सुरू झाला. साधारणपणे साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांचा मोठा कडकडाट होऊन करत असलेल्या मेंढ्याच्या कळपावर वीज कोसळली. त्यामध्ये त्यांच्या तीन मेंढ्या ठार झाल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत आटपाडी तालुक्यात ठिकठिकाणीच्या भागात विजांचा कडकडाट व पावसाची हजेरी होती.
अंकुश रामचंद्र गळवे यांचा मेंढ्या चा कळप आटपाडी निंबवडे रोडवरील लक्ष्मीनगर येथे चराईसाठी सोडून राखण करत असंतांना सायंकाळी पाच साडेपाच च्या दरम्याने मोठ्याने विज कडकडाट करत मेंड्यांच्या काळपावर कोसळली अन त्यात तीन मेंढया ठार झाल्या.