युवा नेते विनायक भोसले उर्फ विनू बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज

उंब्रज तालुका कराड येथील रुपेश प्रकाश गोळे व सचिन नारायणराव जाधव मित्र समूहाच्या वतीने तालुक्याचे युवा नेते विनायक भोसले उर्फ विनू बाबा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर तसेच 50% सवलतीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व मोफत दोन लाख अपघाती विमा असे आयोजन उंब्रज येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये करण्यात आले होते. जवळपास ५६८ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात कार्यरत असलेल्या सर्व डॉक्टर स्टाफचा सत्कार श्री दत्तात्रय साळुंखे चोरेकर, श्री महेश कुमार जाधव उर्फ बाबा, श्री प्रसाद साळुंखे चोरेकर, श्री राजेंद्र चव्हाण त्यांच्या हस्ते करण्यात आला.
या आरोग्य शिबिरासाठी येथील शारदा क्लिनिक, छत्रपती शिवाजी महाराज नेत्र रुग्णालय, राज टीव्ही सेंटर कराड तसेच मुद्रा सी एस सी सेंटर यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी अनिकेत जाधव,अजित गायकवाड, गणेश जाधव, अर्जुन काटे, जीवन पवार, संदीप जाधव, अजित खाते, राम ढवळे, कुणाल जाधव, अनिकेत चव्हाण, प्रमोद जाधव, शंभू पवार, अनुज नागणे, प्रथमेश जाधव, प्रथमेश शिंदे, शैलेश जाधव व मित्र समूह उपस्थित होते.