प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
शेटफळे-आटपाडी रस्त्यावर एकाच ठिकाणी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास काही मिनिटांच्या अवधीतच सात अपघात झाल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,शेटफळे-आटपाडी रस्त्यावर व्यायाम करत असलेल्या मुलगीला काळोख पडण्याच्या सुमारास एका मोटरसायकलने धक्का दिल्याने अपघात झाला. या अपघातानंतर त्या ठिकाणी येण्या-जाणाऱ्यांची गर्दी वाढली. त्या गर्दीमध्ये आणखी एक मोटरसायकल घुसल्याने आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी गर्दीमध्ये येणारे वाहन घुसले.त्यामध्येही काहीजण जखमी झाले.या ठिकाणी जखमी झालेल्यांना दवाखान्यामध्ये नेण्यासाठी त्यांचे वाहन येणार होते. म्हणून त्या ठिकाणी जखमी थांबलेले होते. त्यांच्याबरोबर मोठी गर्दी रस्त्यावरती जमलेली होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे या ठिकाणी अनेक वाहने येऊन या गर्दीवरती आदळली. त्यामुळे या एकाचठिकाणी सात अपघात झाले आहेत. अपघातातील गंभीर जखमींना आटपाडी येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती