आटपाडी कॉलेजच्या प्रा.सौ.राणी खराडे-देशमुख यांचे निधन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रा.सौ.राणी खराडे – देशमुख (खडकाळमळा) यांचे आकस्मित निधन झाले.
अत्यंत कष्टातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयामध्ये गेल्या पाच-सहा वर्षांपासून तासिका तत्त्वावर त्या काम करत होत्या. नुकतीच वर्षभरापूर्वी त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली होती. अत्यंत परिश्रमातून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत महाविद्यालयातील काम प्रामाणिकपणे पार पाडत होत्या. आयुष्यामध्ये संघर्ष करण्यामध्ये त्या कधीही मागे हटल्या नाहीत.हसत खेळत व्यक्तिमत्व, कणखर बाणा, झगडण्याची वृत्ती, कुटुंबाविषयी प्रेम अशा वैविध्यपूर्ण गुणसंपन्न असणाऱ्या एक आदर्श प्राध्यापिका आशा खराडे यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
महाविद्यालयातील सर्व स्टाफकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.