गदिमांच्या पुण्यभूमीत शनिवारी रंगणार खेळ पैठणीचा

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माडगुळे

ग.दि.माडगूळकर ट्रस्ट माडगुळे आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त शनिवार दि.१/१०/२०२२ रोजी रात्री ९:०० वाजता ग दि मा पार माडगूळे येथे खेळ पैठणीचा अर्थात ‘होम मिनिस्टर’ सादरकर्ते प्रतिभा पाटील यांच्या भारदार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.माडगूळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष व माडगुळे ग्रामपंचायतचे सदस्य अमोलशेठ विभुते यांच्या प्रयत्नातून व सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन नवरात्र उत्सव मंडळाने केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकास प्रथम क्रमांकास पैठणी,द्वितीय क्रमांकास सोन्याची नथ, तृतीय क्रमांकास एक ग्रॅम सोन्याचे गंठण देण्यात येणार आहे. तरी माडगुळे गावातील व पंचक्रोशीतील तमाम महिलांनी व मुलींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आव्हान ग दि मा नवरात्रोत्सव मंडळ माडगुळे व संयोजक अमोलशेठ विभुते यांनी केले आहे.