जत नगरपरिषदेला नगरसेवकांनी ठोकले टाळे!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

नगरपरिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात जत नगरपरिषदेचे नगरसेवक विजय ताड यांनी जत नगरपरिषदला टाळे ठोकले. यावेळी अप्पा शिंदे, सचिन जगताप,विशाल कांबळे,सुशील कांबळे,राॅकेश चव्हाण,आदीजण उपस्थित होते.
जत शहरातील कडीमळा येथे गेल्या दोन महिन्यापासून पाण्यासाठी नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. लिकेज काढतो म्हणून टाळा टाळ सुरू असून त्याचबरोबर जत शहरातील देवकाते काॅलनी येथील नागरिकांना घाणीच्या साम्राज्यातून जीवन जगावे लागत आहे.
या ठिकाणी ड्रेनेजचे पाणी मोठ्या प्रमाणात साठत असल्यामुळे नागरिकांचे जगणे मुश्किल बनले आहे. प्रशासनाकडे वारंवार मागणी करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असुन प्रशासनाच्या मनमानी कारभारा विरोधात जत नगरपरिषदेचे नगरसेवक विजय ताड यांनी टाळे ठोकले. अखेर जत नगरपरिषदेच्या कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रियांका कदम यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे टाळे ठोक आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी बोलताना नगरसेवक विजय ताड म्हणाले की, गेल्या दोन महिन्यापासून लिकेच्या नावाखाली कडीमळा येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.प्रशासन जाणीवपूर्वक नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.त्याचबरोबर देवकाते काॅलनी येथील नागरिकांना जगणे मुश्किल झाले असून या ठिकाणी मुरूम टाकण्याची गरज आहे .त्याचबरोबर ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.मात्र प्रशासनाला याचे काही देणे घेणे नसून कर्मचारी फोन उचलत नाहीत.कर्मचाऱ्यांनी निवडणूक लढवावी असे नगरसेवक विजय ताड म्हणाले जर हे प्रश्नन लवकरात लवकर निकालात न काढल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा नगरसेवक ताड यांनी दिला.