संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस तालुक्यातील गोरडवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाचे शाखा अभियंता गोविंद कर्णवर-पाटील यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल उत्कृष्ट अभियंता पुरस्कार झाला होता. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा सोलापूर उत्कृष्ट अभियंता सन्मानपत्र मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ रोजी देण्यात आले.
त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल उत्कृष्ट अभियंता पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यातून व तालुक्यातुन कौतुक व हार्दिक अभिनंदनपर शुभेच्छा दिल्या जात आहेत.
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिन म्हणजेच १५ सप्टेंबर हा दिवस भारतभर अभियंता दिवस म्हणून अभिमानाने साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून शासकीय सेवा बजावतांना केलेल्या उल्लेखनीय कामकाजाची दखल घेऊन, तसेच ही सेवा बजावत असतांना कामातील निष्ठा, शिस्त, सामाजिक आस्था, सहकारी व जनतेचे सहकार्य या बळावर, सर्वमुखी गुणी अभियंता म्हणून नाव लौकिकास पात्र ठरल्याने उत्कृष्ट अभियंता म्हणून गौरविण्यात येत आहे. शासकिय सेवा ही अत्यंत प्रामाणिकपणे करीत आहात. आजपर्यंत शासन सेवेत करीत असलेली सेवा ही खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणून या सेवाकार्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापूरच्या वतीने हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. यापुढे शासकीय सेवा ही अशीच बहरत जावो ही शुभकामना, शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद