प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत आटपाडी तालुका येथे शाळेच्या १०० यार्ड परिसरात असणाऱ्या पान टपऱ्यांवर कोटपा २००३ कायद्यांतर्गत आठ ठिकाणी कारवाई करण्यात आली.यामध्ये ३ हजार रुपये इतका दंड करण्यात आला व कोटपा कायद्याबाबत व तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करणेत आली.
ही कार्यवाही अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील,पोलिस निरीक्षक एस. एस. मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सल्लागार डॉ.मुजाहिद अलासकर , अभिजीत पाटील समुपदेशक,सामाजिक कार्यकर्ता मालतेश तांदळे व पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय कदम यांनी केली.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन