
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
माळशिरस नगरपंचायतचा सातवा वर्धापन दिन सावता माळी मंदिराच्या परिसरात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
तालुक्यात स्थापन झालेल्या नगरपंचायतीपैकी पहिली नगरपंचायत म्हणून माळशिरस नगरपंचायतीकडे पाहिले जाते.माळशिरस नगरपंचायत झाल्यापासून शहराचा अगदीच चेहरामोहरा बदलला आहे .शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा रस्ते, पाणी ,विज, हे पुरवण्यासाठी नगरपंचायतीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. माळशिरस शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपापसातले वाद न उखरता केवळ नगर पंचायत माळशिरसचा विकास हाच ध्यास असणं गरजेचं आहे व सर्वच राजकीय पार्ट्यांनी गाव विकासासाठी एकत्रित येणे ही या पुढच्या काळाची गरज आहे,असे मत माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये मांडलं.
यावेळी विकासदादा धाईजे, पांडुरंग वाघमोडे,मारुती देशमुख , अनिल सावंत, मुख्याधिकारी माधव खांडेकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच माळशिरस ग्रामपंचायत असताना जे लोकांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न केला, अशा सर्व माजी सरपंच माझी ग्रामपंचायत सदस्य माजी नगरसेवक माजी नगराध्यक्ष व प्रतिष्ठित व्यक्ती माळशिरस करांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.तर माळशिरस नगरपंचायतीच्या सर्व समावेशक अशा लोगोचे अनावरण देखील करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ .आप्पासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी सरपंच तुकाराम देशमुख ,विकास धाईजे, विष्णू केमकर,माजी नगरसेवक मारुती देशमुख,तसेच ताई वावरे, विजय देशमुख, रघुनाथ चव्हाण, कोमल जानकर, मंगल गेजगे, कैलास वामन,अर्चना देशमुख,आकाश सावंत,पुष्पाताई कोळेकर, रेश्मा टेेळे ,पुनम वळकुदे ,राणी शिंदे , प्राक्ताज ओव्हाळ ,आबा धाईजे ,शोभा धाईजे , मंगल केेंमकर , लतादेेवी सिद ,गौरव गांंधी ,रावसाहेेब देेशमुख ,संतोष वाघमोडे ,सुरेश वाघमोडे ,महादेव कोळेकर , सचिन वावरे ,अजिनाथ वळकुदे ,वैभव जानकर , यशवंत पवार ,पांडुरंग वाघमोडे ,भगवान थोरात , अनिल सांवत , रंजना पिसे ,उद्धव जमदाडे ,मदुमती सोनवणे ,बबन देवकते उस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले. तसेच प्रस्ताविक व आभार भाग्यश्री बेडगे यांनी मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद