लक्ष्मणराव खटके , आटपाडी /प्रतिनिधी :
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या कर्जदार सभासदांना मोठा दिलासा देणारा निर्णय बँकेने घेतला असल्याची माहिती बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक यु.टी.जाधव यांनी दिली.
बँकेच्या कर्जदार सभासदांच्या मागणीचा विचार करून संचालक मंडळाने जामीनकी नंबर 2 कर्ज EMI पद्धतीचे रक्कम रू .1600000( सोळा लाख रू) याचे 120 महिने हप्ते प्रतिलाख1410 रू हप्ता रक्कमेवरून 160 महिने हप्ते केल्याने प्रतिलाख 1230 रू हप्ता रक्कम बसणार आहे .
तसेच जामीनकी कर्ज रुपये 3000000 ( तीस लाख रू) या कर्जाची 130 हप्त्यावरून 180 हप्ते करण्याचा निर्णय करण्यात आला असून प्रतिलाखास 1470 रू .ऐवजी 1300 रू हप्ता रक्कम बसणार आहे .सध्याच्या जागतिक महामारीत कोवीड19 कर्ज रुपये 100000 (एक लाख रू) हप्ते संख्या 11 महिने वरून 36 महिने करण्यात आले आहेत .त्यामुळे कर्जदार सभासदांना मोठा दिलासा मिळाला असून शिक्षकांच्या हातात अदा होणारा पगार सुद्धा वाढणार आहे.
गेल्या महिन्यापासुन सोलापुर जिल्हा कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी कर्जमर्यादा २५ लाख रुपये करण्यात आली आहे.या निर्णयाचा लाभ नवीन कर्जदार सभासदांना होणार असून जर जुन्या कर्जदारांना याचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांना कर्जरोखे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे.
राज्याचे नेते विश्वनाथ मिरजकर (अण्णा), पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसन अप्पा पाटील, राज्य मा. कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड , राज्य संघटक सयाजीराव पाटील ,शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष बाबासो लाड महासचिव शशिकांत भागवत , जिल्हा सरचिटणीस दयानंद मोरे,कार्याध्यक्ष सतीश पाटील, कोषाध्यक्ष माणिकराव पाटील यांचे मार्गदर्शनानुसार चेअरमन सुनील गुरव,व्हा चेअरमन महादेव माळी व शिक्षक बँकेचे संचालक यांनी कर्जदार सभासदांच्या साठी सदरचा मोठा निर्णय घेतला आहे.
चेअरमन सुनिल गुरव, व्हा.चेअरमन महादेव माळी संचालक तुकाराम गायकवाड,शशिकांत बजबळे, श्रीकांत माळी, यु. टी.जाधव, सदाशिव पाटील, शिवाजीराव पवार ,रमेश पाटील, अर्चना खटावकर , श्रेणिक चौगुले, बाळासो आडके,हरिबा गावडे,राजाराम सावंत यांच्या सहकार्याने शिक्षक समितीने नेहमीच सभासद हिताचे निर्णय घेतले आहेत.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन