
शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण, तरुणीवर चिंचणीवांगी येथील रुग्णालयात उपचार सुरू
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कडेगाव
कोरोनाच्या विळख्यातून कसंबसं सावरत असताना घोणस अळी नावाच्या विषारी अळीचे संकट शेतकऱ्यासमोर येऊन ठेपले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आष्टी येथील एका शेतकऱ्याला या अळीने दंश केल्यानंतर राज्यभरातील शेतकऱ्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना तशीच अळी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे सापडली तर काल सांगली जिल्ह्यातील अंबक ता. कडेगाव येथील शेतातील घरात राहत असलेल्या कुटुंबातील अश्विनी नंदकुमार जगदाळे (वय २०) या तरुणीच्या पायाखाली घोणस आळी सापडल्याने व त्या आळीने अश्विनी जगदाळे हिला तळपायाला दंश केल्यामुळे तिला चिंचणीवांगी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
बीड जिल्ह्यातील आष्टी येथील एका शेतकऱ्याला घोणस आळीने दंश केल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता हे संकट सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कडेगाव तालुक्यात आल्याने शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे. अंबक येथील अश्विनी नंदकुमार जगदाळे ही युवती रविवारी दुपारी दोनच्या सुमारास घराबाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. या वेळी घराजवळ असलेल्या गवतात असलेल्या घोणस नावाची विषारी अळीवर तिचा पाय पडला. यावेळी कुमारी आश्विनीच्या तळपायाला आळीने दंश केला व अळीच्या अंगावरील काटे तळपायाला टोचले. यानंतर वेदना असह्य झाल्यानं तीला चिंचणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. आश्विनीच्या आईने ही आळी प्लास्टिकच्या पिशवीतून डॉक्टरना दाखवण्यासाठी रुग्णालयात आणली होती. यामुळे ती घोणस आळी असल्याचे स्पष्ट झाले.

संबंधित बातम्या
मोठी उपेक्षा पदरी आलेले खानापूरचे घरंदाज नेते – कै . किरणरावभैय्या माने
दै.प्रगल्भनायक,दि.04/06/2023 रोजीचा अंक
दै.प्रगल्भनायक,दि.03/06/2023 रोजीचा अंक