हिवतडचे मोहन पाटील एमपीएससीच्या कर सहाय्यक परीक्षेत राज्यात द्वितीय

आटपाडी दि. 22 (प्रतिनिधी):
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील डोंगरदऱ्यात वसलेले हिवतड गाव. याच गावाचा सुपुत्र मोहन अशोक पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एम पी एस सी च्या परीक्षेतून घेण्यात आलेल्या  “कर सहाय्यक” पदाकरीता महाराष्ट्र राज्यात द्वितीय आणि राखीव गटातून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे .
राज्यात एमपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या कर सहाय्यक पदाच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला .यामध्ये अमरावतीचे शाहिद मोहम्मद आयुब राज्यात प्रथम तर राखीव गटामधून मोहन पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मोहन पाटील यांचा त्यांच्या मायभूमीत हिवतड येथेआटपाडी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.सुमनताई देशमुख , प्रकाशभाऊ देशमुख ,युवा नेते उमाजी सरगर, माणगंगा हायस्कूलचे मुख्याध्यापक  तातोबा पाटील,शिक्षक आनंदराव देशमुख,नानासाहेब पाटील, विठ्ठल माळी,कुमार जावीर, पोलिस पाटील अरुणकुमार सुतार, दत्ता काळे, राहुल म्हमाणे,अनिल डोंबाळे, ,युवा नेते ऋशिकेश साळुंखे ,विजय कोरे,  बिरू सरगर, विनायक देशमुख ,फौजी विकास देशमुख,लक्ष्यदिप  अॅकँडमीचे संचालक सत्यवान पवार सर,बाळासाहेब पाटील,मधुकर पाटील,उत्तम पाटील,प्रकाश पाटील,अरुण पाटील,उमेश पाटील,कांतीलाल पाटील, अशोक भोरे, बाळासाहेब कोळेकर ,दत्तात्रय बनगर, वसंत धुरुपे  यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.