धनगर वाड्यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला मंडळाचा वर्धापन दिन साजरा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कोल्हापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला मंडळ कोल्हापूर या मंडळाचा २२ वर्धापनदिन कोल्हापूर जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा बांद्राई धनगर वाड्यावर साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूरच्या मा. महापौर सुलोचना नाईकवडे होत्या. दीपप्रज्वलन मंडळाच्या अध्यक्षा सौ.आशा माने,उपाध्यक्ष शकुंतला गावडे, अरुणा गावडे याच्या हस्ते व श्रीफळ यशवंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या हस्ते वाढविण्यात आले. यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे,तसेच अहिल्यादेवी महिला मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शशिकला सरगर म्हणाल्या, अहिल्यादेवी महिला मंडळ हे गेली २२ वर्षे सामाजिक कार्यात कार्यरत असून या मंडळाच्या वतीने महिला व किशोरवयीन मुलींच्यासाठी आरोग्य शिबीर तसेच मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त मुलींना गणवेश वाटप करण्यात येतात.यंदाचा २२ वर्धापनदिन आज आम्ही चंदगड तालुक्यातील बांद्राई धनगर वाड्यावर साजरा करून अहिल्यादेवी महिला मंडळ आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे.महिलांना काही अडचण निर्माण झाल्यास आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही आमच्या परीने सोडवण्यासाठी प्रयत्न करु.
यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे साहेब म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर वाड्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली तरी अजूनही मुलभूत सोईसुविधा या धनगर वाड्यावर पोहचलेल्या नाहीत.चहुबाजूंनी घनदाट जंगल व डोंगरदऱ्या यावर यांची जीवन साखळी अवलंबून आहे.जंगलातील जांभळं, करवंद,इ.रानमेवा व वाळलेल्या झाडाच्या फांद्या गोळा करून पंचवीस तीस किलोमीटरहून जास्त अंतरावर जाऊन विकुन मिळणाऱ्या पैशातून आपल्या संसाराचा गाडा चालवायचा. परंतु शासनाच्या चराई बंदी, कुऱ्हाड कोयता बंदी, जंगलात प्रवेश बंदी यासारख्या जाचक कायद्यामुळे यांची संपूर्ण जीवन साखळीच धोक्यात आली आहे.यांची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. आजही या धनगर वाड्यावर दोन तीन दिवस चुली पेटत नाही.यांना जगणं मुश्किल झाले आहे. मग आपल्या मुलांना लागणारे शैक्षणिक साहित्य आणण्यासाठी पैसे कुठून आणणार? त्यामुळे धनगर वाड्यावरील मुलांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. ते लागु नये म्हणूनच एक वही समाज बांधवांसाठी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी हा सामाजिक उपक्रम लोकसहभागातून सुरू केला आहे. याच उपक्रमांसाठी सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती, मंडळ, यांच्याद्वारे शैक्षणिक साहित्य घेऊन ते मुलांना देण्यात येते. याच उद्देश ठेऊन आम्ही सौ.आशा माने अध्यक्ष अहिल्यादेवी महिला मंडळ कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधून त्यांना विनंती केली. आणि आमची विनंतीला त्यांनी मान्य करून आज हा कार्यक्रम करण्यात येत आहे. मंडळाच्या वतीने देण्यात येत असलेले साहित्य रेनकोट, छत्री, स्वेटर, गणवेश, व शैक्षणिक साहित्य खरेदी करताना मी स्वतः उपस्थित होतो. खरं तर या सर्व महिलांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण खरेदी केलेले साहित्य अतिशय दर्जेदार असुन वर्षभर पुरेल येवढे मुलांना दिले आहे. कार्यक्रमास सौ. आशा रतन माने, अध्यक्ष सौ.अरुणा शंकराव गावडे, सौ.अश्विनी बाबासाहेब वाघमोडे, सौ.संगीता अमर जुगळे,सौ. संध्या सुहास नागण्णावर, सौ.नीलिमा दत्ताजीराव हजारे, प्रा.सौ.नागरत्ना ग्याल,प्रा.शशिकला तुकाराम सरगर, सेक्रेटरी श्रीमती माधवी अर्जुन राजगे, सौ.सुनिता सुनील सलगर, सौ.लता आनंदराव शेळकेे, श्रीमती सिंधू प्रकाश घागरे, सौ. शिवानी रामभाऊ सलगर श्रीमती शकुंतला भरमा गावडे, उपाध्यक्ष श्रीमती शोभा विलास हजारे,श्रीमती सुलोचना बंडोपंत नायकवडेे, माजी उपमहापौर शैलजा पांडुरंग ब़न्ने
सौ.सुवर्णा लवटे, सौ.नागरत्ना चंद्रकांत ग्याल, सौ. रागिणी सुभाष पुजारी उपस्थित होते.
प्रास्ताविक सचिन पिटुकले यांनी तर नियोजन अंगणवाडी सेविका व यशवंत क्रांती संघटनेच्या चंदगड तालुका अध्यक्षा सविता डोईफोडे यांनी केले. उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार राहुल पाटील, मुख्याध्यापक सुभाष गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल धुळाप्पा डोईफोडे, आप्पाजी डोईफोडे, पिंटू डोईफोडे, रामु लांबोर विठ्ठल लांबोर, रामु डोईफोडे, नागोबा लांबोर, जनाबाई लांबोर इत्यादी उपस्थित होते.
एकुण धनगर वाड्यावरील अंगणवाडी पासून ते १२वी पर्यंतच्या ४४ मुलांना दप्तर, रेनकोट,छत्री,स्वेटर,ट्रँकसुट व वह्या, कंपास, रंग पेटी इत्यादी शैक्षणिक साहित्य वर्षभर पुरेल येवढे देण्यात आले व उपस्थित मुलांना व सर्वांना लाडू चिवडाचे वाटपही मंडळाकडून करण्यात आले. आभार मुख्याध्यापक सुभाष गवस यांनी मानले
.