डॉ.आप्पासाहेब देशमुख यांना ‘आदर्श नगराध्यक्ष सन्मान २०२२’ पुरस्कार जाहीर

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस

माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांना ‘भास्कर भूषण महाराष्ट्र जर्नालिस्ट फांऊडेशन’ स्टार आयकॉन वर्धापन दिन सोहळा निमित्त ‘आदर्श नगराध्यक्ष सन्मान 2022’ पुरस्कार जाहीर झाला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत विष्णूदास भावे नाट्यगृह वाशी नवी मुंबई येथे रविवार ३० ऑक्टोबर रोजी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जर्नालिस्ट फांऊडेशन समितीच्या वतीने समाजात विविध समाजपयोगी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. डॉ.श्री.आप्पासाहेब देशमुख यांनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात अनेक मोठे योगदान दिले असून राजकीय क्षेत्रातही भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व माळशिरस शहराच्या नगराध्यक्ष पदावर राहून अनेक कामांचा धडका सुरु आहे.या सर्व कार्याची दखल घेऊन आदर्श नगराध्यक्ष सन्मान 2022 पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.त्यांच्या या गौरवामुळे सर्व स्तरावर त्यांचे कौतुक केले जात आहे.