जत तहसीलचा अनागोंदी कारभार!
८० वर्षीय आजोबा आपल्या न्याय व हक्कासाठी बसले उपोषणास!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील आवंढी येथील गट नं. 995 ही जमीन विजय तुकाराम तोरणे वगैरे यांचे नावे होती. जमिन महार वतन इनाम वर्ग २ असल्याने सदर जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार जिल्हाधिकारी यांचे परवानगीशिवाय करता येत नाही. असे असताना मुख्य जमिन मालक विजय तोरणे यांचे नांव कमी करून उच्चवर्णीय समाजातील व्यक्तींनी महसुल अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संगममत करून तसेच बोगस कागदपत्रे तयार करून खरेदी – विक्री व्यवहार केला. मूळ मालक विजय तोरणे वगैरे यांना ७/१२ वरुन बेकायदेशीररित्या कमी करून जमिनीची खरेदी- विक्री केली. या सर्व गोष्टी बेकायदेशीररित्या झाल्या असल्याने विजय तोरणे यांनी रितसर महसुल अधिनिय तरतुदी अन्वये अर्ज व अपील केले असताना जत तहसिल कार्यालय त्याची दखल घेत नसल्याने त्या कुटूंबातील ८० वर्षीय व्यक्तीसह कालपासून उपोषण सुरुवात केले आहे.
महसुल यंत्रणा, त्यांचे कर्मचारी व अधिकारी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी यावेळी केला आहे.या प्रकाराबद्दल आत्मक्लेश करूंन शासनाचा निषेध व्यक्त करती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या आंदोलनास बहुजन समाज पार्टीचे शहर उपाध्यक्ष श्रीकांत सोनवणे यांनी पाठिंबा दिला आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन