प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
निंबवडे
आटपाडी-निंबवडे रस्त्यावरील निंबवडे ओढापात्रावर होणाऱ्या कार्यसम्राट आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नातून ८८ लाख रुपये अंदाजपत्रकीय नवीन पुलाचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माणगंगा कारखान्याचे माजी संचालक मारुतीराव पिंजारी, दिघंचीचे सरपंच अमोल मोरे, आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय (पंच )पाटील, चेअरमन अरविंद चव्हाण, निंबवडेचे माजी उपसरपंच बाळासाहेब मोटे,सार्वजनिक बांधकाम विभाग आटपाडीचे अधिकारी मोरे, ठेकेदार इंद्रप्रस्थ कन्ट्रक्शन , ज्येष्ठ नेते कैलास (बापू) देवडकर, झरे गावचे युवा नेते राजू अर्जुन, निंबवडे ग्रां.पं. सदस्य सचिन मोटे, मुढेवाडीचे सरपंच अनिल मुढे, युवा नेते सतीश मुढे,मनोज नांगरे,डॉ.बी.टी .पिंजारी, मधुकर शेट पाटील, किरण (काका) पाटील , अमोल होळे, नाथा मेटकरी ,मोहन ठोंबरे , साऊबा अनुसे, माजी उपसरपंच राजेंद्र बुधावले, आनंद आनुसे, बाबा पिंजारी , गणेश हेगडे , शंकर कारंडे, विलास पिंजारी, अमोल पाटील , मोहन पिंजारी , संकल्प मोटे , दत्ता मोटे, व इतर मान्यवर उपस्थित होते.
“निंबवडे-आटपाडी रोडवरील निंबवडे गावच्या दळणवळणसाठी महत्वाच्या असणाऱ्या निंबवडे ओढापत्रावरील जुन्या पुलाची उंची कमी असल्यामुळे अन् मागील दोन वर्षात पाऊस जोरदार पडल्यामुळे निंबवडे पुलावरून बऱ्याच वेळा पाणी गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे लोकांची गैरसोय लक्षात घेऊन सदरील नूतन पुलाच्या कामासाठी कार्यसम्राट आमदार अनिल भाऊ बाबर यांच्याकडे सांगली जिल्हा बँकेचे नूतन संचालक तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नातून पाठपुरावा केला.”
बाळासाहेब मोटे
माजी उपसरपंच, निंबवडे

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती