अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील शाळा बांधकामाच्या बाबतीत ग्रामसेवक व संबंधित सरपंचांनी, अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरचा लाड करू नये, काम हे चांगलं दर्जाचे करून घ्यावे अन्यथा संबंधितावर कारवाई करण्यास कुचराई करणार नाही. शाळा आणि शिक्षण यांचे महत्त्व पटवून देताना ग्रामसेवक, संबंधित मुख्याध्यापकांची कान उघाडणीही करण्यात आली. तसेच लागेल तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत पंचायत समिती सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीला संबोधित करताना सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनकर खरात, गट शिक्षणाधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी पाणीपुरवठा, शिक्षण, अंगणवाडी, सार्वजनिक बांधकाम या विभागांची बैठक घेण्यात आली. तालुक्यातल्या शाळा खोल्या, शाळा निर्लेकनाचे प्रस्ताव, बांधकाम ह्या बाबतीत तातडीने कारवाई करण्यात यावी, या संदर्भात आमदार सावंत यांनी संबंधित विभागांना आदेश दिले.
पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील ३८ गावांना मंजुरी मिळाली आहे.सदरच्या काही गावातील उद्घाटनही झाली आहेत. तेथे कामेही सुरू आहेत. शाश्वत पाणी उपलब्ध या संदर्भात पंचायत समिती सभागृहात सर्व गावचे ग्रामसेवक, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यासंबंधी प्रोसिडिंग तयार करून जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालय यांना येत्या काळात बैठक लावून हा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती