कवठेमहांकाळ येथे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजयबापू हजारे यांचा वाढदिवस साजरा

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ

कवठेमहांकाळ तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय (बापू)हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले व त्यांच्या कौटुंबिक,सामाजिक व राजकिय घोडदौडीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माणिकराव भोसले, जिल्हा प्रतिनिधी धनाजीराव पाटील, जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष अविराजे शिंदे सरकार, शहराध्यक्ष राजाराम घोरपडे, काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा.दादासाहेब ढेरे, कवठेमहांकाळ विकास सोसायटीचे संचालक बाळासाहेब पाटील,कवठेमहांकाळ नगरपंचायतचे नगरसेवक विश्वनाथ पाटील,गुलाब मकानंदार,जालिंदर शिंदे,सुशांत शिंदे,जगन्नाथ माने,शिवाजी ओलेकर (अलकुड एस), हर्षवर्धन चौगुले, महेश ओलेकर,बाळासाहेब जगताप, मुबारक मुल्ला,भारत कराळे,कैलास साळुंखे,विठ्ठल पाटील,चैतन्य पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.