गॅस दरवाढी विरोधात जतमध्ये बोंबाबोंब आंदोलन !

महाराष्ट्र कामगार सेनेने दर कमी करण्याकडे लक्ष वेधले!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जत शहरात प्रभाग क्रमांक १० मध्ये महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने गॅसच्या दरवाढी विरोधात बोंबाबोंब आंदोलन घेण्यात आले.
केंद्र सरकारने घरगुती गॅसची किंमत दर एक हजार दहा रुपयेपेक्षा जास्त दरवाढ केल्यामुळे महिला वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे. गरीबांना आता गॅसवर स्वयंपाक करणे अवघड झालेले आहे. एक तर गॅस वेळेवर मिळत नाही आणि त्यामध्ये गॅसचे दर भरमसाठ वाढल्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे अवघड झालेले आहे. या गॅसच्या दरवाढीमुळे सर्व स्तरातून नाराजी व्यक्त केली जात आहे‌.
यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने चूल पेटवून आपला निषेध व्यक्त केलेला आहे. यासाठी केंद्र सरकारने गॅस दरवाढीचा फेरविचार करून गॅसचे दर परत कमी करावेत, याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.यानंतर प्रशासनाला लेखी पत्राद्वारे इशारा देण्यात येईल असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र कामगार सेना तालुका प्रमुख सुरेश घोडके, तालुका उपप्रमुख सोमनाथ पाटील, प्रभाग क्रमांक १० चे शाखाप्रमुख अब्बास मुजावर, निखील भिसे, भीमराव आडसुडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.