माळशिरस प्रतिनिधी /संजय हुलगे:
तरंगफळ येथील नागपंथी गोसावी समाजातील शिंदे कुटुंबात झालेल्या गॅस दुर्घटनेत आईसह दोन चिमुरड्यांना आपला प्राण गमवावा लागला होता. या दुर्दैवी घटनेने सर्व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेपासून ते आता पर्यंत शिंदे कुटुंबियांवर कोसळलेल्या या दुर्दैवी संकटात सहभागी होण्यासाठी विविध पक्ष, सामाजिक संघटना मदतीचा हात देण्यासाठी पुढे येत असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक, आधारवड, उद्योजक, टि, एस काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या पुढाकाराने या दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तूंची मदत करून सामाजिक बांधिलकीचा वसा आणि वारसा कायम ठेवुन त्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले आहे. यावेळी शिंदे कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार, असे आश्वासन स्वाभिमानीचे अजित बोरकर सांत्वनपर भेटीत म्हणाले. यावेळी तरंगफळ गावचे सरपंच ज्ञानेश्वर (माऊली) कांबळे यांच्यासह संघटनेचे तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या अगोदर संघटनेने लाॅक डाऊनच्या काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून तरंगफळ डोंबाळवाडी, खुडूस ,कांचननगर ,शिपाई वस्ती, दत्तनगर ,विझोरी, निमगाव ( म) , विजयवाडी या गावातील जनसामान्यांचा आधार देणारी म्हणून ओळख निर्माण केली आहे.
या सांत्वनपर भेटीदरम्यान संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, तरंगरफळ गांवचे सरपंच (माऊली )कांबळे ,गोपाळ (काका ) घार्ग अमरसिंह माने देशमुख ,अजित कोडग राहुल बिडवे, दशरथ मोरे पाटील ,समाधान काळे, आहिल पठाण आदी मंडळी उपस्थित होती.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती