प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
मुंबई
शिवसेनेचे अंधेरी पूर्व या मतदारसंघाचे विद्यमान आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबई येथे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते.ते दुबईला त्यांच्या कुटुंबीयांसह गेले असताना आमदार लटके यांना हृदयविकाराचा झटका आला.आमदार लटके हे सलग दोन वेळा शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आलेेेे होते.त्यांच्या निधनाची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.
रमेश लटके हे १९९७ साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते सन २००२ व २००९ च्या महापालिका निवडणुकीत विजयी होवून पुन्हा महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. तसेच २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.दुबई येथे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
दांडगा लोकसंपर्क आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील एक उमदे नेतृत्व म्हणून आमदार लटके यांना ओळखले जात होते. त्यांच्या निधनाची माहिती शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून. त्यांचे पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक