प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
दिघंची
दिघंची ता.आटपाडी येथील श्रद्धा अतुल ढोक यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक अभियंता वर्ग -२ राजपत्रित पदावर जलसंपदा विभागात सहायक अभियंता पदी निवड झाली.
सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या व लाकडी वखार चालवणाऱ्या पित्याचे स्वप्न साकार करीत जय तुळजाभवानी या आश्रम शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या श्रद्धाने अधिकारी होण्याचा मान मिळवला.
आई, वडील व कुटुंबियांकडून तिला प्रोत्साहन मिळाले. पती अतुल ढोकचीही साथ मिळाली. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या श्रद्धाचे दिघंची परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक