अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील कंठी येथील कंटी ग्राम सर्व सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध करण्यात आली.जत तालुक्यात प्रथमच भाजप व रासप एकत्र येऊन ही सोसायटी बिनविरोध करण्यात आली.
भाजप नेते रावसाहेब मोठे व रासपचे नेते अनिल दादा मदने यांच्या नेतृत्वाखाली कंटी विकास सोसायटी ही बिनविरोध करण्यात आली आहे.बिनविरोध झालेले संचालक व प्रवर्ग: सर्वसाधारण गटामधून अनुक्रमे मोटे रावसो राघू, जानकर पंडित हरिबा, खरात धर्मा हरिबा, मोठे म्हाळू धोंडी, मोठे अण्णाप्पा नागू, वगरे बिरा कोंडीबा, इरकर तुकाराम सयाप्पा, मदने दादासो शिवाजी, इरकर बिरा कृष्णा,अनुसूचित जाती जमाती-लांडगे शिवाजी भिमा
महिला राखीव-मोठे शांताबाई आनंदा,कोळेकर शांताबाई केरबा, भटक्या विमुक्त जाती व जमाती-पाटील अरविंद मारुती, इतर मागास प्रवर्ग मधून-पवार रावसाहेब ज्ञानू हे बिनविरोध संचालक झाले आहेत.यावेळीकार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती