साहित्यिक शंकरराव खरात यांचे आटपाडीमध्ये स्मारक करा – विलासराव खरात

आटपाडी /प्रतिनिधी :
आटपाडी तालुका आणि माणदेशी माणसं सातासमुद्रापार नेणारे महाराष्ट्रांतील पाच साहित्यिक या माणदेशी मातीत निपजले.यातीलच काही साहित्यिक आजही उपेक्षित दुर्लक्षित राहिले, त्यातीलच एक नाव म्हणजे शंकरराव खरात.ज्यांची तराळ अंतराळ कादंबरी देश विदेशात पोहोचली, राष्ट्रपतींनी देखील त्यांचा गौरव केला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते जळगाव येथे अध्यक्ष राहिले, डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात हे पुस्तकही फार गाजले त्यांची पुस्तके आजही अस्पृश्य समाजाला तसेच शोषित वंचित पीचलेल्या दबलेल्या समाजाला प्रेरणादायी आहेत.
ज्या व्यक्तीला देशविदेशातील लोकांनी डोक्यावर घेतले ज्या व्यक्तीचं कार्य कर्तृत्व आभाळाला गवसणी घालणारं ठरलं, परंतु वंचित समाजातुन आल्याने त्यांच्या साहित्याला त्याचा फटका बसला.
व प्रस्थापित व्यवस्थेने त्यांचे साहित्य पुढे येऊ दिले नाही. डाॅ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ते काही काळ कुलगुरूही ‌होते.

पण आटपाडी तालुक्यातील प्रस्थापित व्यवस्थेने त्यांंचा कोणताही गौरव केलेला नाही. आटपाडी तालुक्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक या महाराष्ट्र शासनाने करावे असेही आयू.खरात म्हणाले
काल त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न डाॅ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी चे सचिव आयू. विलासराव खरात यांच्या कडुन आटपाडी चे तहसीलदार सचिन लंगुटे यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे महाराष्ट्र शासनाला अशी विनंती करण्यात आली.