आटपाडी येथे ‘अर्थक्रांती’…भारतीय जेष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियानची बैठक संपन्न

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी येथे अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच, भारतीय जेष्ठ नागरिकांचे जीवन गौरव अभियानाची आटपाडी तालुक्यातील पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिकांची
बैठक तांबडा मारूती मंदिरात पार पडली.
तालुकाध्यक्ष व्ही.एन.देशमुख अध्यक्षस्थानी होते. श्रीराम सोनवणे, तानाजी गायकवाड, सचिव दत्तात्रय मोकाशी, सल्लागार अरविंद चांडवले, विजयसिंह देशमुख, उपाध्यक्ष भास्कर गायकवाड, शामराव जाधव, कोषाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख, सुरेश कासार, औदुंबर पोतदार, हरी विठ्ठल रावण व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
अध्यक्ष व्ही.एन.देशमुख यांनी इतिवृत्तांत वाचून दाखविले. आटपाडी येथे दिनांक ८ मे रोजी होणाऱ्या जिल्हास्तरीय बैठकीबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात तालुका प्रशासनात समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.