माळशिरसमध्ये कोरोनाची एंट्री, एक पॉझिटिव्ह तर ११ जणांचे स्वॅब तपासणीला !

माळशिरस तालुका प्रतिनिधी/ संजय हुलगे :

माळशिरसमध्ये रविवारी संध्याकाळी एका महिलेचा खाजगी रूग्णालयात कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची एकच धांदल उडाली.प्रशासनाने तात्काळ तो परिसर सील केला असल्याची माहिती माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे यांनी सांगितले.

 माळशिरस शहर व परिसरात महसुल ,नगरपंचायत ,पोलिस स्टेशन व आरोग्य विभाग यांच्यावतीने या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.काल सायंकाळी माञ माळशिरस शहरातील 58 फाटा चौकातील एका महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.याची माहिती प्रशासनाला मिळताच माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. विश्वनाथ वडजे,महसुल प्रशासन,पोलिस प्रशासन आरोग्य विभाग यांनी त्या कोरोना बाधित महिलेच्या घराचा परिसर सील केला आहे. तो परिसराचे निरजिंतूकरन केले आहे. तसेच या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.