माळशिरस शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सोमवार एक दिवस सर्व दुकाने बंद राहणार

माळशिरस तालुका प्रतिनिधी /संजय हुलगे

माळशिरस शहरातील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने प्रशासनाच्या व नगरपंचायतीच्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचे माळशिरस शहर व्यापारी संघच्या वतीने सांगण्यात आलं असून पुढील येणा-या आदेशा प्रमाणे सूचना मिळतील त्याप्रमाणे यामध्ये बदल करण्यात येणार असल्याचे नगरसेवक व संघाचे अध्यक्ष मारुती देशमुख यांनी सांगितले. यासाठी सर्व व्यापा-यांनी सहकार्य करावे असे त्यांच्या वतीने आवाहन करण्यात आल आहे.

माळशिरस शहरात म्हसवड रोड परिसरात येथे आज सायंकाळी एका महिलेचा करोनाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.माळशिरस शहर व परिसरात कोरोनाची लागण होऊ नये या दृष्टीने आरोग्य विभाग, महसुल, नगर पंचायत व पोलिस प्रशासन यांनी विशेष परिश्रम घेतले.परंतू आज कोरोनाने शहरा मध्ये शिरकाव केला असून एका महिलेची रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून ती राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. शहरात आता कोरोनाने प्रवेश केल्याने नांगरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.