
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
चिकोडी (जि.बेळगाव) येथे नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फांऊडेशन व हेल्थ ॲन्ड नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या मार्फत कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकिय, इंजिनियरनिंग व डेव्हलपर्स, गोल्डन ज्वेलरी व सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या निवडक व्यक्तींचा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.यावेळी माळशिरस शहराचे नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांना आंतरराज्य गौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व केंद्रीय मंत्री कडून अभिनंदनपर पत्र व म्हैसूर फेटा देऊन सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातून डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी श्रीमती रत्नमाला सावनूर (मा.केंद्रीय मंत्री) बॅलिस्टर अमरसिंह पाटील (मा.खासदार बेळगाव), सुधीर सावंत (ब्रिगेडीयर इंडियन आर्मी मुंबई), महेश मेघण्णावर (जिल्हा पोलिस प्रमुख गुलबर्गा), सुरेशदादा पाटील (चेअरमन मेट्रो हायटेक कोल्हापूर), अरविंद घट्टी (मा.जिल्हा कमांडंट होमगार्ड डिपार्टमेंट कर्नाटक) आदी मान्यवर उपस्थित होते.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती