जतमध्ये विक्रम फाऊंडेशनतर्फे खास महिलांसाठी रंगपंचमी महोत्सव

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :

विक्रम फाऊंडेशन आयोजित खास महिलांसाठी भव्य रंगपंचमी महोत्सव जत येथील भारती विद्यापीठ, महिलांचे वसतिगृह येथे आयोजित केल्याची माहिती संयोजिका सौ.वर्षाताई विक्रमदादा सावंत व सौ मिनलदीदी सावंत-पाटील यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी विक्रम फाउंडेशन, जत यांच्या वतीने केवळ महिलांसाठी मंगळवार दि.२२/२/२०२२ रोजी भव्य रंगपंचमी महोत्सवाचे आयोजन सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. रंगपंचमी महोत्सवाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
भन्नाट फनी गेम्स,आकर्षक स्पॉट गिफ्ट ,स्थानिक कलाकारांचे निवडक नृत्याविष्कार ,कराओके साऊंड ट्रॅक वरील गाणी,भरपूर ओले व सुके रंग, मुबलक पाणी उपलब्ध केले जाणार आहे.तसेच दणदणीत आवाजाची डी.जे. साऊंड सिस्टिम व इतर सर्व व्यवस्था केली जाणार आहे.तरी महिलांनी या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन संयोजिका सौ.वर्षाताई विक्रमदादा सावंत व सौ.मिनलदीदी सावंत-पाटील यांनी केले आहे.