अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत तालुक्यातील विविध रस्ते, पूल बांधकाम व नवीन न्यायालय इमारत बांधकामासाठी एकूण ६२ कोटी, ८४ लाख रु.चा निधी मंजूर झाला आहे,अशी माहिती आ. विक्रमसिंह सावंत यांनी दिली.
याबाबत आ.विक्रमसिंह सावंत यांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्र राज्याचा सन २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प शुक्रवारी विधिमंडळात सादर झाला. या अर्थसंकल्पात जत तालुक्यासाठी ६२ कोटी, ८४ लाख रु.चा निधी मंजूर झाला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या मतदारसंघातील प्रमुख जिल्हा मार्गासाठी २९ कोटी, ९४ लाख रुपये नाबार्डमधून पुलांसाठी २ कोटी व नवीन न्यायालय इमारत बांधकामासाठी ३१ कोटी ४९ लाख रुपये इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. रस्ते बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मिळालेल्या निधीमुळे मतदारसंघातील रस्ते मजबूत होणार आहेत.
जत तालुक्यातील राज्यमार्ग १६० संख तिकोंडी को. बोबलाद यासाठी २ कोटी ५० लाख, डफळापूर अनंतपुर प्रजीमा ६५ साठी ७ कोटी १२ लाख ५० हजार, दरीकोनुर ते मुचंडी प्रजिमा ६९ साठी ४ कोटी २७ लाख ५० हजार, वळसंग ते सोरडी प्रजिमा १४३ साठी १ कोटी ९९ लाख ५० हजार रु, दरीकोनुर प्रजिमा ७२ साठी २८ लाख ५० हजार, सोरडी गावभाग प्रजीमा ६९ साठी २८ लाख ५० हजार, अक्कळवाडी गावातील लांबी प्रजीमा ७३ साठी २८ लाख ५० हजार, सिद्धनाथ ते सिद्धनाथ फाटा प्रजिमा ११० साठी २८ लाख ५० हजार, वायफळ ते अचकळहळळी रामा १५६ साठी ३ कोटी, सोन्याळ ते सोन्याळ फाटा रामा ३८५ साठी ३०करजगी ते बोर्गी प्रजिमा ७० साठी ९५ लाख , तिप्पेहळळी ते कोसारी प्रजिमा १४२ साठी ३ कोटी ३२ लाख ५० हजार, उमदी ते सुसलाद प्रजिमा ७३ साठी ९५ लाख, शेगाव कोसारी कुंभारी बेळूंखी प्रजीमा ६५ साठी २ कोटी ३७ लाख ५० हजार, प्रतापूर गुळवंची वाळेखींडी डोंगरगाव रस्ता प्रजीमा १०९ साठी १ कोटी ४२ लाख ५० हजार रु, नराळे फाटा ते घोलेश्वर प्रजीमा ७० साठी २८ लाख ५० हजार, पांडोझरी गावाजवळील पूल बांधकाम करणे यासाठी २ कोटी रु. व जत येथील नवीन न्यायालय इमारत बांधकाम कामासाठी ३१ कोटी ४९ लाख रुपये इतका असा एकूण ६२ कोटी, ८४ लाख रु. चा निधी मंजूर झाला आहे.
मतदार संघातील रस्ते सुसज्ज असतील, तर निश्चितपणे वाहतूक वाढून मतदारसंघाचा विकास होण्यास मदत होते. मतदारसंघातील जास्तीत जास्त निधी खेचून आणण्याचा प्रयत्न आहे. येत्या काही दिवसांमध्ये मतदारसंघातील सर्वच रस्ते चांगले करण्यासाठी तसेच रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे, असे आ. विक्रमसिंह सावंत म्हणाले.
जत तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास ७५ लाख इतका निधी मंजूर झाला आहे.तालुक्यातील बागेवाडी, साळमळगेवाडी, गुगवाड, निगडी बु.व शिंगणापर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन