अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
जत तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी देण्यासाठी मी कटीबध्द असून गावागावात विविध योजनांतून पाणी योजना मंजूर केल्या आहेत. तसेच शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे. त्यामुळे या योजना पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास आमदार विक्रमसिंह सांवत यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील मेंढीगीरी येथे जलजीवन मिशनमधून ८८ लाख, ३० हजार, ४३४ निधी मंजूर झालेल्या नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या शुभहस्ते झाला.त्यावेळी आ. सावंत बोलत होते.
यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आप्पाराय बिराजदार, जि.प. सदस्य महादेव पाटील,माजी पं.स.सभापती बाबासाहेब तात्या कोडग,उपविभाग पं.स. जतचे प्रसाद काटकर, माजी सरपंच प्रकाश पाटील, माजी सरपंच सुभाष बिराजदार, उपसरपंच अजित कांबळे, ग्रा. प. सदस्य भीमराय बिराजदार, सदाशिव ऐवळे, अनिल करके, माजी उपसरपंच सुरेश व्हनवाडे, प्रकाश वाघमोडे, श्रीशैल शिवंगशी, यल्लवा कांबळे व इतर ग्रामस्त उपस्थित होते.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन