दिघंची येथील पद्मिनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन व विज्ञान दिन साजरा

कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /दिघंची:

दिघंची येथील इंद्रभाग्य कृषी व ग्रामीण विकास संस्थेच्या पद्मिनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक ईश्वरतात्या मोरे-पाटील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते.प्राचार्या सौ.स्वातीताई मोरे-पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले.
राष्ट्रीय मराठी राजभाषा दिनानिमित्त पारंपारिक वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करून सादरीकरण केले. ज्युनियर केजी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयावर मनोगत व्यक्त केले.तसेच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी
विविध नाविन्यपूर्ण प्रयोग सादर केले.सर्व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व वैज्ञानिक प्रयोगांना भेट दिली व त्यांच्या कार्याला चालना दिली.
विज्ञान विभागप्रमुख पाटील मॅडम यांनी संयोजन केले.सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रणदिवे यांनी केले व वाघमारे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या वेगवेगळ्या विभागातील प्राचार्य ए.एस.मदने, प्राचार्य एन.बी.शेंडगे, प्राचार्य ए.एन. पानस्कर, प्राचार्य पी.एस.कसबे, मुख्याध्यापक जी.बी.मोरे प्राचार्य मलकारी, प्राचार्या पी.आर.कुंभार उपस्थित होते.