निंबवडेत आ.पडळकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
निंबवडे येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते १ कोटी ३० लाख रुपये निधीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ. पुष्पाताई जयवंतभाऊ सरगर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, भाजपाचे युवा नेते जयवंतभाऊ सरगर, पंचायत समितीचे उपसभापती दादासाहेब मरगळे,मार्केट कमिटीचे उपसभापती दिलीप खिलारी, सरपंच नंदाताई देटे,उपसरपंच सौ. मंगल मेटकरी,माजी सरपंच धुळा दादा देवडकर,माजी सरपंच नामदेवराव मोटे, माजी सरपंच डी.एस.पाटील,माजी उपसरपंच शैनाज रमजान तांबोळी,चेअरमन बाबासाहेब पाटील,चेअरमन विलास पिंजारी, व्हाईस चेअरमन विठोबा अनुसे, व्हाईस चेअरमन पांडुरंग देवडकर ,ग्रा.पं. सदस्य विक्रम देवडकर, महिरूना तांबोळी, आबासाहेब आनुसे, कुंडलिक पिंजारी, अमर मुढे, गणेश कबीर, भाजपा युवा नेते अनिल सूर्यवंशी, डॉ. बाळकृष्ण पिंजारी ,युवा नेते बाजीराव पिंजारी, युवा नेते सचिन आप्पा मोटे, भाजपा निंबवडे अध्यक्ष धनाजी पाटील, युवा नेते आबासो भानवसे, निंबवडे गावचे ग्रामसेवक संजय करणे ,पोलीस पाटील प्रवीण मंडले, सोसायटीचे सदस्य,पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
१) आटपाडी-निंबवडे मार्गावरील ओढापात्रावर नवीन पूल बांधणे : १ कोटी रुपये
२) दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत गणेश देटे घर(ग्रामपंचायत जवळ) ते आटपाडी निंबवडे रस्ता बंदिस्त गटर करणे : ५ लाख रुपये
३) घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत निंबवडे गावांतर्गत बंदिस्त गटर करणे : २५ लाख रुपये
या कामांचा शुभारंभ करण्यात आला.