तळवेल येथे एकाच रात्री दोन बँकांवर दरोड्याचा निष्फळ प्रयत्न

रत्नदिप तंतरपाळे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदूर बाजार :

चांदूर बाजार तालुक्यातील तळवेल येथील जिल्हा मध्यवर्ती बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँका दिनांक १ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात इसमाने दोन्ही बँकेचे दरवाजे फोडून आत प्रवेश केला. परंतु त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. या दोन्ही बँकांमधून खास हाताला लागले नाही.सकाळी नागरिकांना दोन्ही बँकेचे दरवाजे उघडे दिसल्याने त्यांना शंका आली म्हणून त्यांनी त्वरित कर्मचाऱ्यांना संपर्क केला. माहिती मिळताच चांदूरबाजार स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास केला. दोन्ही बँकेतील रोकड सुरक्षित असून अज्ञात इसमाविरुद्ध चांदूरबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती चांदूरबाजार पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील किणगे यांनी दिली.
तळवेल येथील सेंट्रल बँक व अमरावती मध्यवर्ती बँक या दोन्ही बँक स्थानिक व आजूबाजूच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असून बँकेमध्ये एकूण सात गावांचा समावेश आहेत.१ मार्च रोजीच्या मध्यरात्री तीनच्या सुमारास दुचाकीवर तीन युवक स्वार होऊन बँक फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला असे सेंट्रल बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. परंतु चेहऱ्यावर कापड बांधल्याने ओळख पटली नाही. अमरावती मध्यवर्ती बँकेतील सीसीटीव्ही मागील काही दिवसांपासून बंद असल्याचे दिसून आले. गावातील दोन्ही बँक फोडून लुटण्याचे धाडसी प्रयत्न केले. परंतु त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. बँकेच्या शटरच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये शिरले. परंतु त्यांना वेळेअभावी त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचा अंदाज आहे.
सुरुवातीला यांनी ग्रामपंचायत कार्यालयाजवळील व वस्तीतील बँक फोडून लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु येथून त्यांना रिकाम्या हातांनी परत यावे लागले. नंतर रात्री तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी बस स्टॉप जवळील सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथील बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये पैसे लुटण्याच्या इराद्याने गेले असावेत. परंतु तेथून सुद्धा त्यांना येत्या पावलीच परत यावे लागले. मोठी घटना टळली.
सकाळच्या सुमारास स्थानिक नागरिकांना दोन्ही बँकेचे शटर दरवाजे उघडे दिसून आले व नागरिकांना शंका आली असल्याने त्यांनी त्वरित कर्मचाऱ्यांना संपर्क केला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पोलिस तपास केला.