माजी मंत्री स्व.पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त जत येथे वह्यांचे वाटप

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. पतंगरावजी कदम यांच्या जयंतीनिमित्त व कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रम फौंडेशन जतच्या वतीने जत तालुक्यातील तिल्याळ, असंगी, गोंधलेवाडी, संख, भिवर्गी, मोरबगी, माणिकनाळ, अक्कळवाडी, गिरगाव, लवंगा, गूळगुजनाल, कोणते बोबलाद, कोणबगी, करेवाडी येथे वह्यांचे वाटप आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की, स्व. पतंगरावजी कदम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अनन्यसाधारण आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा त्यांनी दारोदारी पोहोचवली. त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत विश्वजीत कदम त्यांचे कार्य पुढे नेत आहेत .शिक्षणाची विचारधारा आणखी सक्षम करण्यासाठी आज जत तालुक्यामध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सरदार पाटील, जत पंचायत समितीचे माजी सभापतीचे बाबासाहेब (तात्या)कोडग,रामपूरचे माजी सरपंच मारुती पवार, आदी उपस्थित होते.