जांभुळणी येथे सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

‘गावसर्वे’च्या अनोख्या व नावीन्यपूर्ण उपक्रमास प्रारंभ

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

बळीराजा फौंडेशन व ग्रामपंचायत जांभुळणी यांच्यावतीने ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयासमोर साजरी करण्यात आली.
बळीराजा फौंडेशनच्या वतीने आजच्या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून अनोखे व नाविन्यपूर्ण असे गाव सर्वे करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानिमित्त स्वयंसेविकांना मार्गदर्शन करण्यात आले. एका स्वयंमसेविका व स्वंयसेवकास ३० कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे नियोजन केले. यासाठी ग्रामपंचायत जांभुळणीस सर्वेचे महत्त्व पटवून देण्याचे काम बळीराजा फौंडेशनच्या सौ.जयश्रीताई झंजे व कार्यकर्ते यांनी केले.
सर्वेक्षण ३ जानेवारी ते २० जानेवारी २०२२ पर्यंत करण्याचे उद्दिष्ट सौ.जयश्री झंजे यांनी करण्याचे नियोजन केले असून यासाठी २० स्वयंमसेवकांची टिम तयार केली आहे. याकामी ग्रामपंचायत संपूर्णपणे आपल्या सोबत राहील असे सरपंच सौ.संगिता मासाळ यांनी सांगितले.टीममध्ये १) नंदाताई वागीरे, २)मालन मस्के, ३)रूपाली, मासाळ,४)रूपाली गवळी,५)लताताई वाघमारे,६)लक्ष्मी घागरे ७)योगीताताई चोपडे ८) श्रीकांत गावडे ९) दादासाहेब मासाळ १०)ओंकार गुरव ११) संजय गरदडे १२)विनायक झंजे १३) मनोज कांबळे १४) रमेश मलमे १५)पांडूरंग झंजे १६)अक्षय मासाळ १७) ओंकार माने १८) नितिन माने १९)सलीम मुलाणी २०)रूपेश वाघमारे यांचा समावेश आहे.


सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व गावसर्वेक्षणाच्या कार्यक्रमप्रसंगी सरपंच सौ.संगिता मासाळ , पोलिस पाटील सौ.अनिता पाटील, माजी सरपंच व भारतीय जनता पक्षाचे अनु.जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद माने, मा.उपसरपंच गजानन पावले,कृषी पर्यवेक्षक के.एस. घोडके,कृषी सहायक एस.बी.काळेल , कृषी सहायक रामदास ढवळे , ग्रामसेवक जयंत खंडागळे,आर्जून गावडे, विनायक झंजे, शंकर माने, संजय लोहार व बळीराजा फौंडेशनचे अध्यक्ष भाई शिवराम मासाळ व मान्यवर उपस्थित होते.