
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे :
ग.दि.माडगूळकर यांच्या पावनभूमीत १ कोटी ११ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा माडगुळे येथे पार पडला.
या विकास कामात चिंद्यापिरी ते शेटफळेकडे जाणारा रस्ता डांबरीकरण २० लाख रुपये, लिंगडेवस्तीकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे २० लाख रुपये,नवीन ३ बंधारे बांधकाम करण्याकरता ६० लाख रुपये ,जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व कंपाउंड बांधकाम करण्यासाठी ८ लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालयासमोर पेविंग ब्लॉक बसवणे ३ लाख अशा एकूण १ कोटी ११लाख इतक्या निधीतून साकारलेल्या व साकारणाऱ्या कामाचा लोकार्पण सोहळा व नियोजित कामाचा उद्घाटन सोहळा माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर,माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे , भाजपा नेते जयवंतराव सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी सभापती सौ. भूमिकाताई बेरगळ, रुपेश पाटील ,ऋषिकेश देशमुख, माडगूळकर उद्योग समूहाचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य अमोल (शेठ) विभुते व गावातील मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
बी.डी.एस बँकेचे व्यवस्थापक महेश लिंगडे, सोसायटीचे माजी चेअरमन दगडू लिंगडे, उमेश लिंगडे, सतीश लिंगडे ,पांडुरंग लिंगडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन लिंगडे, मोहनराव विभुते, बबन पवार ,बापूसाहेब विभुते ,ग्रामपंचायतीचे सरपंच सौ. संगीता गवळी, माजी सरपंच संजय विभुते, उपसरपंच विशाल (बंडू )झोडगे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उद्धव विभुते, सुनील विभुते, हॉटेल सयाजीराजेचे सचिन कंडरे, राहुल विभुते, माजी सरपंच विठ्ठल गवळी,संजय (आप्पा )विभुते, माजी चेअरमन गौतम झोडगे ,पांडुरंग लिंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर म्हणाले, माडगुळे गावातील कुठल्याही विकास कामाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. दिलेल्या निधीचा पुरेपूर चांगल्याप्रकारे वापर केला जावा. अध्यक्ष भाऊसाहेब लिंगडे यांनी आभार मानले. जिल्हा परिषद सदस्य सदस्य अरुण बालटे यांच्या फंडातून ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती