
नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
कोरोना महामारी, निसर्गाच्या लहरीपणामुळे व वाढत्या महागाईमुळे शेतकरीवर्ग, कॉलेज युवक -युवती, नोकरदार मेटाकुटीस आला आहे.या सर्वांच्या मनी एकच प्रबळ इच्छा आहे की आपल्या जवळ एक टू व्हीलर गाडी असावी.मात्र पेट्रोलच्या वाढत्या दरांमुळे व गाडीच्या वाढत्या किंमती लक्षात घेता हे आपल्या खिशाला पेलत नाही. हीच माणसाची नस ओळखून माडगुळे गावचे नवउद्योजक मुस्तफा इनामदार यांनी आटपाडीमध्ये माडगूळकर ई बाइक्स हे टू व्हीलर शोरूम सुरू केले. या शोरूमचा उद्घाटन सोहळा दिमाखात मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक उदयसिंह देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमास माडगूळकर उद्योगसमूहाचे अध्यक्ष व माडगुळे ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल (शेठ )विभुते, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुणभाऊ बालटे, आटपाडीचे अॅड.चेतन जाधव, आरग शोरूमचे मालक धीरज पाटील, आटपाडीचे ऋषिकेश देशमुख, जयलक्ष्मीचे श्रीराम चौधरी, शहाजान इनामदार,माडगुळे गावचे माजी सरपंच संजय विभुते,ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उद्धव विभुते ,वसंतराव विभुते ,दादा मोटे सर, दिनकर पाटील, डी टी पाटील,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा माडगुळेचे शाखाधिकारी विश्वजित देशमुख व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
यावेळेस कंपनीचे पवार यांनी या ई बाईकची माहिती पटवून दिली. ही गाडी ताशी ४५ ते ५० किलोमीटरच्या वेगाने धावते. या गाडीची बॅटरी ही ६० वॅट व २४ एंपियर असून या बॅटरीचे सरासरी आयुष्यमान हे ३ वर्षाचे किंवा ८० हजार किलोमीटरचे आहे. या गाडीचे दोन्ही टायर हे ट्यूबलेस असून गाडीची किंमत ही सर्वसामान्यांना परवडेल अशीच आहे. या गाडीला मेंटेनेस खर्च हा कमी आहे अशी माहिती कंपनीचे पवार यांनी दिली.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती