
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :
मुंबईकरांना झोडपून काढणाऱ्या पावसाची तमा न बाळगता बेमुदत संपावर असलेल्या एसटी कामगारांनी बुधवारी भर पावसातही आझाद मैदान सोडले नाही. या कामगारांच्या पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून सांगली येथील जत आगारामधील कामगारांनी आझाद मैदानातील आंदोलकांसाठी तब्बल ५ हजार भाकरी आणि १५ किलो शेंगदाण्याची चटणी, लोणचे, ठेचा अशी न्याहारी पाठवली.
पावसात बसायला मंडप नसून सोबत आणलेले सामान ठेवण्याची पुरेशी व्यवस्था नसतानाही कामगारांनी दाखवलेल्या जिद्दीचे राज्यभरातील कामगारांमधून कौतुक केले जात आहे. त्यामुळे पावसात भिजून आंदोलनावर ठाम राहिलेल्या कामगारांमुळे राज्यातील एसटी कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे एसटी कामगारांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरूच ठेवले आहे.
उपोषणाला आपल्या बांधवांना पाच हजार भाकरी, चटणी असे साहित्य सांगली जिल्ह्यामधील जत आगारातील कर्मचाऱ्यांनी पाठवून मदत केली आहे.यावेळी बी.टी. माने,बी.बी. शिंगाडे, मोहन वाघमारे, आर. के. कोळी ,पोपट शिंदे, नेमाळे, प्रदीप थोरात, हामीत मुल्ला, दिलीप पांढरे आदि एसटी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक