कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्यांचे आज पंचगंगा नदीत जलसमाधी आंदोलन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी आंदोलक कर्मचारी आज अकरा वाजता पंचगंगा नदीत जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या लढ्यात सहभाग घेऊन आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूर येथील आंदोलन बारा दिवस सुरू असतानाच याबाबत कोणीही चर्चा करण्यासाठी फिरकले नाही, असा आरोप करीत आंदोलक आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निलंबित पाच कर्मचाऱ्यांसह पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी योग्य मार्ग निघत नसताना उलट कर्मचाऱ्यांना निलंबित करून व कारवाई करून दडपण आणत आहेत. या धसक्याने काही कर्मचाऱ्यांच्या प्राण्याचा बळी गेला आहे.असे असतानाच चर्चा करून ढोस मार्ग काढण्याऐवजी सरकार कारवाईची आक्रमकता वाढवत चालले आहे. एसटीच्या खाजगीकरणाचा घाटही घातला गेला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आंदोलन हे शांततेच्या व लोकशाहीच्या मार्गाने सुरू असल्याचे सांगत या आंदोलनाकडे चर्चा करण्यासाठी गेल्या अकरा दिवसांपासून सर्वांनी पाठ फिरवली आहे.त्यामुळे आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता एसटी कर्मचारी पंचगंगा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहेत. यामध्ये निलंबित पाच कर्मचारीही जलसमाधी आंदोलनात सहभागी होणार आहेत.