भिंगेवाडी येथे विहिरीत बुडून एकाचा मृत्यू !

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:

आटपाडी तालुक्यातील भिंगेवाडी येथे छबु मारुती हजारे (वय ५०, रा.कृषी विद्यालयाजवळ,भिंगेवाडी आटपाडी जि.सांगली) यांचा विहीरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. याबाबतची फिर्याद पोलीस पाटील वसंतराव तळे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यांमध्ये दिली आहे. याबाबतचा प्राथमिक तपास पोलिस नाईक वगरे करीत आहेत.