
आटपाडी दि.२९(प्रतिनिधी):
शेटफळे येथील कृषिकन्या बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक व अखिल भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष रुपेश गायकवाड यांच्या वतीने गावातील गरजू गोरगरिबांना 400 जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा नेते राहुल गायकवाड, माजी उपसरपंच बळीराम गायकवाड, प्रगतशील शेतकरी बाजीराव गायकवाड, सेवानिवृत्त वाहक दादासाहेब गायकवाड, माजी सरपंच दत्ता कांबळे,माजी सरपंच पांडुरंग गायकवाड,आटपाडी तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष गौरीहर पवार,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष राजेश जाधव,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शेटफळे येथील रुपेश गायकवाड व त्यांचे बंधु प्रगतशील शेतकरी अमर गायकवाड हे गरजू गोरगरिबांना सदैव मदत करतात. लॉकडाउनच्या काळात हाताला काम नसल्यामुळे अनेक कुटुंबांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना मदतीची गरज ओळखून या बंधूंनी पुढे येऊन गरजूंना मदत केली. साखर,शेंगदाणे,हरभरा डाळ, साबण, टूथपेस्ट, चहा, गोडतेल,खोबरेल तेल, सॅनीटायझर यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा या किटमध्ये समावेश होता. यामुळे गोरगरीब व गरजू लोकांना दिलासा मिळाला असून अनेक लोकांनी त्यांचे आभार मानले.
शेतकऱ्यांसाठी सध्या बियाणांच्या तुटवड्याचा कालावधी सुरू आहे, तसेच दुष्काळ व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याकडे पैशा-पाण्याची उपलब्धता नाही. पेरणीचा हंगाम सुरू आहे. ही गरज ओळखून त्यांनी शेतकऱ्यांना बियाणे देण्याचा निर्णय घेतला आहे.


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती