नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी बेमुदत संपावर!

खरेदी-विक्रीचे व्यवहार खोळंबणार!
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांनी दि.२१ सप्टेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत संपास जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने जाहीर पाठींबा दिला आहे.
महाराष्ट्र राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी शासनाकडे गेली तीन-चार वर्षे विविध मागण्यांसंदर्भात निवेदने देऊनही शासनाकडून त्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संघटनेने नोंदणी व मुद्रांक विभागातील रिक्तपदे त्वरीत भरावीत यासह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी मंगळवार दि.२१ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला आहे.
अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाने त्वरीत दखल घ्यावी व त्यांच्या मागण्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा,यासाठी जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी यांच्या दि.२१ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या बेमुदत संपास जाहीर पाठींबा दिला आहे.जत तालुका मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने आज पाठींब्याचे पत्र येथील दुय्यम निबंधक अधिकारी सुनिल पाथरवट यांना दिले असून संप काळात मुद्रांक विक्री बंद ठेवणार असल्याचे कळविले आहे.
यावेळी मुद्रांक विक्रेते अशोक पडोळकर,विजय जाधव,सिद्राया पाटील,मल्लापा तेली,बाबासाहेब काटे,नेताजी शिंदे,बाबासाहेब काशीद,श्रीकृष्ण पाटील, बबन चोरमुले,बाबासाहेब कदम,अरविंद तिल्ल्याळकर, गणपत वायफळकर आदि उपस्थित होते.