‘इथं रस्ताचं खुणावतोयं मरणाला’!

उंबरगाव जवळचा रस्ता’कट’ बनतोय जीवघेणा!
कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची :

कराड-सोलापूर महामार्गावर सोलापूर व सांगली जिल्हा सरहद्दीवर उंबरगाव येथे रस्ता कट होताना पडलेला खड्डा(रस्ता ‘कट’) जीवघेणा झाला आहे.
सोलापूर जिल्हा व सांगली जिल्हा सरहद्दीवर कटफळ आणि उंबरगाव गावांची शिव आहे.त्याठिकाणी रस्ता करण्याचे काम चालू होते. सांगली जिल्हा हद्दीतील रस्ता करण्याचे काम चालू होते.परंतु सोलापूर जिल्हा हद्द सुरू होत असताना वनीकरणाचा भाग आहे.पूर्वीपासून त्या क्षेत्रातूनच हा रस्ता जातो. मात्र वनीकरण खात्याने आता रस्त्याचे काम थांबवले आहे.त्यामुळे सोलापूर हद्द सुरू होत असताना व सांगली जिल्हा हद्द संपली की डांबरीकरण होऊन कट झालेल्या रस्त्यावर एक मोठा खड्डा-रस्ता ‘कट’ पडला आहे.तो जीवघेणा खड्डा झाला आहे.या महामार्गावर रोज किमान एक तरी अपघात होतो,असे हे ठिकाण बनले आहे.
सांगली जिल्ह्यात अगदी हद्दीपर्यंत रस्त्याचे काम टकाटक झाल्यामुळे भरधाव जाणाऱ्या वाहनाच्या चालकास अचानक आडवा खड्डा नजरेस आल्यामुळे फसगत होते. त्यामुळे वेगाने येणारे वाहन जोरदारपणे आपटते व पुढे पूर्वीच्या जुन्या रस्त्याला मिळते. तसेच सोलापूरच्या दिशेने आलेले व दिघंचीकडे जाणाऱ्या वाहनालाही असाच झटका बसतो. वाहतूकीचा वेग कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.