
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:
आटपाडी तालुक्यातील दहा गावांना जलजीवन योजनेअंतर्गत तत्वत: मंजुरी मिळाली असून ५५७.०८ लक्ष निधी मंजूर करण्यात आला आहे.आमदार गोपीचंद पडळकर,माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख तसेच आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांच्या विशेष प्रयत्नातून जलजीवन योजनेअंतर्गत ही मंजूरी मिळाली असल्याची माहिती भाजपा नेते जयवंतराव सरगर यांनी बोलताना दिली.
आटपाडी तालुक्यातील १)मानेवाडी 2) कानकात्रेवाडी ३)पारेकरवाडी ४)घाणंद ५)माडगुळे ६)वाक्षेवाडी ७)मुढेवाडी ८)बनपुरी ९)माळेवाडी १०)लेंगरेवाडी या दहा गावांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.या गावांना पहिल्यांदाच आज तत्वतः मंजुरी मिळालेली आहे.
आटपाडी तालुक्यातील ४३ गावांचा पुढील दोन-तीन महिन्यात प्रश्न सुटणार आहे.त्याही गावांचा सर्वे चालू झाला आहे.बाकीच्या गावचा यापूर्वीच राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.सर्व कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत.त्यामुळे आटपाडी तालुक्यातील सर्व गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे,असे भाजपा नेते जयवंतराव सरगर बोलताना म्हणाले.
आमदार गोपीचंद पडळकर यांचे या कामासाठी शेवटपर्यंत सहकार्य लाभले.आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर, आटपाडी पंचायत समितीचे सर्व सदस्य, आटपाडी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, गट विकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी या सर्वांच्या अथक प्रयत्नाने पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
आटपाडी तालुक्यातील जनतेच्यावतीने सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन