

पब्जी गेमचा नादंच ‘डेंजर’ !
१६ वर्षाच्या मुलाने गमावले १० लाख !
घर सोडून गेला पळून !
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:

पब्जी PUBG गेमच्या नादात एका १६ वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून १० लाख रुपये ट्रान्सफर केले व नंतर घर सोडून निघून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
भारतात पब्जी गेमची जबरदस्त क्रेझ आहे.या गेमच्या नादात १६ सोळा वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून तब्बल १० लाख रुपये ट्रान्सफर केले.इतकी मोठी रक्कम, पैसे ट्रान्सफर झाल्याचे समजल्यानंतर मुलगा घरातून फरार झाला. परंतु मुंबई क्राईम ब्रँचच्या मुस्कान युनिटला मुलगा घरापासून काही अंतरावर आढळला. त्यानंतर त्याला ठाण्यात नेऊन त्याचे समुपदेशन करण्यात आले. मुंबई क्राईम ब्रांचने घरातून पळून गेलेल्या या मुलाला ट्रेस केलं आणि शोधून काढलं.आता त्याला कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एका १६वर्षीय मुलानेPUBG/BGMI पब्जीचा गेमिंग आयडी, गेमर टॅग खरेदी करण्यासाठी आई-वडिलांच्या अकाउंटमधून १० लाख रुपये ट्रान्सफर केले. या पैशांचा उपयोग पब्जी मोबाईलच्या इन गेम करन्सी म्हणजे युसी खरेदीसाठी केला गेला. रिपोर्टनुसार, मुलाच्या आई-वडिलांनी सांगितलं की, घरातून पळून जाण्याआधी त्याने घरात एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्याने घर सोडण्याबाबत आणि परत कधीही न येण्याबाबत लिहिलं होतं.
मुलाचे आई-वडील गेमच्या नादात अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर केल्यामुळे बुधवारी २५ ऑगस्ट रोजी त्याला ओरडले होते. आई-वडिलांच्या रागावल्यामुळे घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्राइम ब्रांचने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याला ट्रेस केले आणि शोधून काढले.
मुंबईतील अंधेरी भागात राहणारा हा मुलगा होता.आई-वडिलांनी मुलगा घरातून पळून गेल्यानंतर त्याच्या जवळच्या मित्रांकडे, परिसरातील मित्रांकडे चौकशी केली. परंतु तो कुठेही सापडला नसल्याने आई-वडिलांनी अखेर पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान, याआधीही पब्जीसारख्या ऑनलाइन गेमच्या नादात अनेक अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक संस्थांनी ऑनलाइन गेम बंद करण्याची मागणीही केली आहे. ऑनलाइन गेममुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे. पालकांनीही आपल्या मुलांकडे मोबाइल फोन दिल्यानंतर त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक