तळेवाडीत दूध डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई!

४१ हजारांचे पदार्थ जप्त: सहायक आयुक्त (अन्न) सु.आ.चौगुले
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
अन्न औषध प्रशासन सांगली विभागाकडून भेसळीच्या संशयावरून करण्यात आलेल्या कारवाईत सुमारे ४१ हजार रूपयांचे पदार्थ जप्त करण्यात आले असल्या्ची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु.आ.चौगुले यांनी दिली.
तळेवाडी ता. आटपाडी येथील जनसेवा दुध संकलन केंद्र या डेअरीवर छापा टाकून म्है‍स,गाय दुध या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित ३ हजार १२५ रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच पेढीमध्ये दुधात भेसळ करण्यासाठी व्हे् पावडर व रि.पाम कर्नेल ऑईल यांचा साठा ठेवल्याचे आढळून आल्याने सदर पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित ३८ हजार, २०० रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला व गाय दुध व म्हैस दुधाचा साठा नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीम.पवार, केदार व नमुना सहायक कवळे यांनी केली आहे. सर्व अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानतंर त्यावर पुढील कारवाई घेण्यात येणार आहे. ग्राहकांना अन्न पदार्थाच्या गुणवत्तेविषयी काही तक्रार असल्यास अन्न औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु.आ. चौगुले यांनी केले आहे.