उद्यापासून बाजार होणार सुरु!

आठवडा बाजार सुरु करण्यास परवानगी : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनूसार जिल्ह्यात दिनांक 19 ऑगस्ट 2021 रोजी पासून आठवडा बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
आठवडा बाजारमध्ये कोव्हिड – 19 च्या अनुषंगाने राज्य शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्देशांचे पालन होते अगर कसे याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांनी व पोलीस प्रशासन यांनी नियंत्रण ठेवावे. तसेच सदर आठवडा बाजार सुरु करताना संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक राहील असेही त्यांनी कळविले आहे.