वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले उपोषण

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
मिरज तहसीलदार कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील कामचुकार, बेशिस्त, निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करून तशी नोंद त्यांच्या सेवा पुस्तकावर व्हावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवार दि.१४ ऑगस्ट २०२१ रोजी आमरण उपोषणाला सुरु करण्यात आली.
मिरज तहसीलदार कार्यालयातील अन्न पुरवठा विभागात ३-३ वर्ष झाले गोरगरीब, कष्टकरी, श्रमिक जनतेचे रेशन धान्य मिळण्याबाबत अर्ज अडखळले आहेत. त्यावर त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नाही. अशा परिस्थितीत गोरगरीब,कष्टकरी, श्रमिक जनतेने काय करावे? गोरगरिबांनी जगायचे कसे? हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. विचारणा केली असता अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून बेशिस्त वर्तवणुक, अभद्र व्यवहार, अशोभनीय भाषा करून गोरगरीब नागरिकांना भीती घालण्यात येते. असाच प्रकार तोडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी सोबत केला आले.
सांगली जिल्हा अन्न धान्य पुरवठा अधिकारी यांनी, यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना मिरज तहसीलदार कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील कारवाई तसेच संबंधित जबाबदार अधिकारी यांच्या खातेनिहाय चौकशी सुरू असल्याची लेखी प्रत देण्यात आली.तसेच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या विनंतीला मान देऊन तात्पुरता आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. कारवाई न झाल्यास पुन्हा येत्या ८ दिवसांनी दिनांक २३ ऑगस्ट २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पिढीत कष्टकरी श्रमिक नागरिकांना घेऊन आमरण उपोषण सुरू करू असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, जिल्हा महासचिव उमरफारूक ककमरी, जिल्हा संघटक संजय कांबळे, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत भोसले,अनिल अंकलखोपे,परशुराम कांबळे,सचिन कोलप, हिरामण भगत,आंनदा गाडे,सिद्धार्थ कोलप, मानतेश कांबळे,संतोष कदम,चंद्रकांत कांबळे,सर्जेराव सावंत यांच्याबरोबरच श्रमिक, कष्टकरी, पिढीत नागरिक उपस्थित होते.